Formation of ATC

दिनांक : 1 जून 2010

विषय :- प्रशिक्षण संस्थांची राज्यव्यापी संघटना आणि ह्या असोसीएशन द्वारा मान्यताप्राप्त कॉम्प्युटर कोर्सेस

सर्व संस्था चालक मित्रहो,
असोसीएशन ऑफ ट्रेनिंग सेन्टर्स (ATC) सेंटर फॉर इंम्पलीमेंटिंग कॉम्प्युटर एज्युकेशन, (CICE) ही संगणक केंद्रांची संघटना पुणे येथे स्थापन करण्यात आली आहे. या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने, मी संदीप ताम्हनकर, (Advocate) आपणाशी या पत्राद्वारे संवाद साधत आहे. संगणक प्रशिक्षण व्यवसायाच्या भूतकाळ आणी वर्तमानकाळाचे आपण साक्षीदार आहोत. आपण कष्ट करून मोठे केलेले Brand आता स्थिरस्थावर झाल्यावर करत असलेली मनमानी, काही विशिष्ठ ब्रॅन्डची एकाधिकारशाही, धोरणं ठरविण्यामध्ये तुम्हाला काहीच स्थान नसणं, सरकार दरबारी आपण कोणाच्या खिजगणतीतही नसणं, याची जणू काही सवय झाली असल्यासारखी परिस्थिती आहे. इतक्या वर्षाच्या परिश्रमानंतर येणारा भविष्यकाळ उज्ज्वल असावा अशी आपल्या सर्वांची रास्त अपेक्षा आहे.

कोणत्याही शासकीय अथवा सामाजिक पाठबळाशिवाय संगणक संस्था चालक हा व्यवसाय करत असतो. शाळा, कॉलेज मधील पारंपारिक शिक्षण आणि उद्योग व्यवसायाची गरज यामध्ये मोठी तफावत असते. पदवी / पदविका मिळवलेल्या विद्यार्थाला इंडस्ट्रीच्या गरजांनुसार वेगवेगळी कौशल्य शिकवण्याचं अतिशय महत्वाचे असं काम आपण संस्थाचालक करत असतो. B.Com. कॅन्डीडेटला इंटरव्ह्यूमध्ये 'तुला टॅली येतं का?' असा पहिला प्रश्न विचारला जातो. हे Tally आपण शिकवितो. कुठल्याही कॉलेजमध्ये हे शिकवलं जात नाही. असे अनेक स्किलसेट्स शिकवून विद्यार्थ्याला नोकरी साठी सक्षम बनवण्याचं काम केवळ आपण संस्था चालक करतो. पण इतक्या महत्वाच्या कामाची योग्य ती दखल घेतली जात नाही. एक प्रकारे हा Thankless Job होऊन बसतो.

आज महाराष्ट्रामध्ये सुमारे २० ते २५ हजार ट्रेनिंग सेन्टर्स आहेत. त्यावर अवलंबून असलेल्यांची, त्यामधून रोजगार मिळवत असलेल्यांची संख्या सुमारे एक लाख आहे. एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या समूहासाठी एक सशक्त असं व्यासपीठ, एक संघटना असण्याची गरज आहे. हे काम कोणीतरी केलं पाहिजे. असं केवळ म्हणून चालणार नाही, काहीतरी कृती करावी लागेल, कोणालातरी पाऊल उचलावे लागेल. आपल्या हितसंबंधांचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी संघटन स्थापन करणे आणि अशा संघटनेचे सभासद होणे हा प्रत्येक भारतीय नागरिकाला राज्यघटनेने बहाल केलेला अतिशय महत्वाचा असा मुलभूत अधिकार आहे.

सामाजिक क्षेत्रातील कामाचा, संगणक प्रशिक्षण संस्थांचे MCED चे ATC नेटवर्क चालविण्याचा, वकिली व्यवसायाचा असा विविध क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव मला आहे. संघटनेच्या कामामध्ये असा अनुभव उपयुक्त व महत्वाचा आहे. सुरवातीला अनेक समविचारी, सहकारी, मित्रपरिवार व विविध क्षेत्रातील मान्यवरांना एकत्र घेऊन हि संघटना स्थापन करण्यात आली असली, तरी व्यापक आणि खुल्या स्वरूपाचं सभासदत्व असणारी, सर्वांना मतदानाचा हक्क असणारी, सर्वसमावेशक अशी हि राज्यव्यापी संघटना आहे. संस्था चालकांची एकजूट आणि पाठींबा तसेच या संघटनेला मिळत असणारा प्रतिसाद अतिशय उत्साहवर्धक आहे. संघटनेची ध्येय, धोरणं, अपेक्षा, कामाचे स्वरूप, विस्तार, सभासदत्वाचे फायदे या संबंधी आपल्याला सविस्तर कळविले जाईलचं.

या संघटनेच्या माध्यमातून आपण इतिहासात प्रथमच एक स्वतःचा कॉम्प्युटर ट्रेनिंगचा ब्रॅन्ड, कोर्सेस, सर्टीफिकेशन आणि प्रशिक्षण केंद्रांना मान्यतेची योजना सुरु करत आहोत. आजवर आपण इतरांचा ब्रॅन्ड मेहनतीने चालविला, पुढे नेला, आणि त्यामधील फोलपणाही आपल्या लक्षात आला. उगाचंच कुठल्यातरी So Called Government मान्यताप्राप्त सर्टीफिकेशनसाठी प्रत्येकाने हजारो नव्हे लक्षावधी रुपये मोजले आणि अशा Brands ची मनमानी वर्षानुवर्ष सहन केली. हे थांबलं पाहिजे. आता आपल्या संघटनेचा स्वतःचा ब्रॅन्ड असेल. शेवटी Brand म्हणजे तरी काय? अनेक वर्ष व्यवसायात राहून कमविलेले नाव, गुडविल, स्थान, ह्या सर्व गोष्टी आपल्याकडेही आहेतच. आता आपण चालवू तो ब्रॅन्ड, आपण म्हणू त्या पद्धतीनं चालेल तो आपला ब्रॅन्ड.

CICE ATC ही शासकीय पातळीवर रजीस्टर्ड, मान्यताप्राप्त, पंजीकृत, कायदेशीर संस्था / संघटना असणार आहे. त्यामुळे आपल्या सर्वांकडे संघटनेचा एक भक्कम Brand असणार आहे.

Association of Training Centres :- ATC ची केंद्र मान्यता घेण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे, आकर्षक आहे, संस्था व केंद्र चालकांच्या फायद्याची आहे. या योजनेची घोषणा केल्यापासून आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामधून शेकडो लोकांनी प्रतिसाद दिला आहे. किमान पाच (५) कॉम्प्युटर व प्रशिक्षित तज्ञ शिक्षक असलेल्या कोणालाही मान्यतेसाठी अर्ज करता येईल. यामध्ये विविध आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अनेक विद्यार्थिप्रीय कोर्सेस चालवता येतील. केंद्र मान्यतेच्या अर्जाचा नमुना, कोर्सेसचे तपशील, अभ्यासक्रम, कालावधी व Fee Structure सोबत जोडले आहे.

मान्यतेसाठी एका वर्षाची लायसन्स फी केवळ रु. २,५००/- (रुपये दोन हजार पाचशे मात्र) आहे. (१०.३० % Service Tax लागू आहे.) लायसन्स फी व्यतिरिक्त इतर कोणतेही डिपॉंझीट नाही. या फीमध्येच तुम्हाला असोशिएशनची मेंबरशीपही दिली जाईल व त्याचे अनुषंगिक फायदे आपणाला मिळत राहतील. कोर्स फीच्या केवळ १५ % रॉयल्टी / ऑथोरायझेशन फी भरायची आहे. (१०.३० % Service Tax लागू आहे.) केंद्रांना (तसेच विद्यार्थ्यांनाही) या फी मध्येच छापील कोर्स मटेरीअल / पुस्तकं कोणत्याही वेगळ्या शुल्काशिवाय मिळणार आहे. म्हणजेच १५ % रॉयल्टी मध्येच पुस्तकेही मिळणार आहेत. पुस्तकांसाठी वेगळे पैसे भरण्याची गरज नाही. तसेच CICE पुणे मार्फत वृत्तपत्रांमधील जाहिरातीही दिल्या जातील.

या शिवाय मागणीनुसार परीक्षा, वेळेत मिळणारं, आकर्षक आणि महाराष्ट्र शासनाच्या सेवायोजन कार्यालयात नोंदणीक्षम प्रमाणपत्र, सपोर्ट मटेरीअल, प्रमोशनल मटेरीअल, सोपं रिपोर्टिंग, वेब बेस फ्रेमवर्क, ISO प्रमाणपत्रासाठी नोंदणी, शासकीय व इतर अनुदानित योजनांमध्ये सहभाग व व्यवसाय इ. अनेक गोष्टी या मध्ये समाविष्ट असणार आहेत. केंद्रांना मान्यता देण्याची संपूर्ण प्रक्रिया परस्पर विश्वास, जबाबदारी, लोकशाही व स्वातंत्र्य या उदात्त मानवी तत्वांवर आधारित आहे. केंद्रचालक या मान्यतेसोबत इतरही कोणत्याही मान्यता वा स्वतःचे कोर्सेस चालवू शकणार आहेत.

District Co-ordinator ची नेमणूक:- संस्थेचे मेंबर्स वाढविणे, मेंबर्सच्या अडीअडचणीची दखल घेणे, संस्थेची ध्येय धोरणे व कार्यक्रम जिल्ह्यामध्ये राबविणे, मान्यताप्राप्त प्रशिक्षण केंद्रांची संख्या, विद्यार्थि व नेटवर्क वाढविणे, इन्स्पेक्शन, देखरेख, सपोर्ट, मान्यता देणे, परीक्षा घेणे, जाहिरात व इतर प्रमोशनल कामे इ. साठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये DC ची नेमणूक केली जाईल. सदर DC नां कामाच्या प्रमाणात योग्य असा आकर्षक मोबदला दिला जाईल. जिल्हा समन्वयकाच काम अतिशय महत्वाचं, आव्हानात्मक व नेतृत्वगुण वाढवणारं असणार आहे.

जिल्हा समन्वयक म्हणून मनापासून काम करण्याची इच्छा असणाऱ्या संस्था चालकांनी / व्यक्तींनी आमच्याशी आवर्जून संपर्क साधावा हि विनंती.

मित्रहो, आपणा सर्वाना मी असं आवाहन करतो कि एकत्र येऊ या, ताकद वाढवूया, भविष्य घडवूया, इतिहास लिहूया. आपल्या सर्वांच्या पाठींब्यावर आणि शुभेच्छांसह हे एक पाऊल टाकलेलं आहे. संघटना स्थापनेचा उद्देश Constructive काम करणं आहे, कोणाच्या विरोधात काम करणं नाही. त्यामुळे कोणत्याही दबावाला अथवा अपप्रचाराला बळी न पडता, मनामध्ये शंका कुशंका न आणता आपण संघटनेचे सभासदत्व आणि मान्यता घेऊन सहकार्य करावे व व्यवसाय वृद्धी करून घ्यावी हि विनंती. या संबंधी तपशीलवार चर्चेसाठी आपल्या सर्वांशी प्रत्यक्ष भेटून सविस्तर चर्चा करायची आहे. या संबंधात जिल्हावार बैठका घेण्याचही नियोजन असून अशा मिटिंगचं निमंत्रण वेगळं पाठविण्यात येईलचं. त्या आधी आपण मान्यतेचा अर्ज पाठवून द्यावा तसेच जिल्हा समन्वयक पदासाठी इछुकानीही संपर्क साधावा हि विनंती.

धन्यवाद..
आपला,

अॅड. संदीप ताम्हनकर,
संस्थापक अध्यक्ष
असोसीएशन ऑफ ट्रेनिंग सेन्टर्स
सेंटर फॉर इंम्पलीमेंटिंग कॉम्प्युटर एज्युकेशन