End of Certification Era

दिनांक: 10 जानेवारी 2011

प्रती,
प्रशिक्षण केंद्रचालक,

प्रिय मित्रहो,
असोशिएशन ऑफ ट्रेनिंग सेंटर्स या संस्थेच्या नोंदणीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. आता संघटनेमार्फत मोठ्या प्रमाणावर सर्वत्र विविध उपक्रमांची जोरदार सुरवात करण्यात येईल. संघटनेची वेबसाईट www.atcglobal.org लवकरच चालू होत आहे. या वेबसाईटवर आपणाला सर्व माहिती उपलब्ध होईलच. कृपया आपण सदर वेबसाईटला भेट द्यावी हि विनंती. या मध्ये आपणाला संघटनेची ध्येयधोरणे, घटनापत्र, नियमावली, संस्थापक सदस्यांची माहिती, संघटनेमार्फत चालवल्या जाणा-या विविध योजना आणि कार्यक्रम, याची तपशीलवार माहिती मिळेल. या वेबसाईटवर विविध सर्व्हेज, तक्रारी, डिस्कशन बोर्ड, ऑनलाईन मेंबरशिप फॉर्म इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

2010 हे वर्ष अनेक अर्थांनी वेगळं होतं. आपल्या सारख्या प्रशिक्षण संस्थांसाठी कसोटीचा आणि अवघड असा हा कालावधी होता. एका बाजूने भरमसाठ वाढणारी महागाई आणि खर्च, तसेच दुस-या बाजूने कॉम्प्युटर कोर्सेसला मिळणारा घटता (कमी होत जाणारा) प्रतिसाद अशा पार्श्वभूमीवर येणारं वर्ष कसं जाणार याची सर्वांनाच काळजी आहे. वर्षभरात फक्त मार्च ते ऑगस्ट पर्यंत संस्थेमध्ये विद्यार्थी असतात आणि त्या नंतरचे सहा महिने रिकामे असं आपल्या व्यवसायाचं स्वरूप झालं आहे. वाढलेली जागांची भाडी, चांगल्या Faculty साठी द्यावा लागणारा वाढीव पगार, अतिशय खर्चिक अशी जाहिरात, फोन, इंटरनेट, पेट्रोल खर्च, हे सर्व मात्र वर्षभर चालू ठेवावे लागते. MS-CIT सारख्या कोर्सची फी जरी वाढली असली तरी त्याला दहावीच्या सुट्टीत करायचा कोर्स असं मर्यादित स्वरूप आलेलं आहे. इतर कोर्सेसचा प्रतिसाद आणि फी कमी होतेयं. यामुळे नवीन वर्षामध्ये या सर्व परिस्थितीमध्येही पुरेसा व्यवसाय व्हावा म्हणून आत्ताच काळजीपूर्वक Strategy आखली पाहिजे त्याचं नियोजन (Resource Planning) आणि अंमलबजावणी (Execution) केली पाहिजे.

रामभरोसे किंवा असेल माझा हरी किंवा सर्वांच होईल ते माझं होईल या भावनेने जर काम करायचं नसेल तर काही ठोस योजन बनवून त्यावर वर्षभर काम करणं गरजेचं आहे. त्यासाठी मॅनेजमेंटचं एक सोपं तत्व आहे. त्याला SWOT Analysis असं म्हणतात.
S – Strengths - माझ्या संस्थेची बलस्थानं कोणती?
W – Weaknesses - माझे माझ्या संस्थेची कमकुवत स्थानं काय आहेत?
O – Opportunities - माझ्या समोर कोणत्या संधी आहेत?
T – Threats - मला सध्या कशापासून धोका / अडचणी / Problems आहेत?

प्रामाणिकपणे वरील चार प्रश्नांची उत्तरे शोधल्यास स्पष्ट परिस्थिति समोर येते. अशी स्पष्टता असल्यावर यशाचं नियोजन करणं जास्त सोप ठरतं. प्रत्येकाने आवर्जून वरील SWOT Analysis करावं. त्यामधून आपण नविन वर्षात नक्की काय करणार याचं नियोजन करता येईल. सर्वसाधारणपणे वर्षभरासाठी खालीलप्रमाने नियोजन केल्यास संपूर्ण वर्षभर व्यवसाय वाढवता येईल.

MS-CIT Business : सेंड ऑफ़ फंक्शन, जाहिराती, फ्लेक्स, हॅन्डबिलस्, मेळावे, कॅम्प, केबल अॅड, MKCL व TP कडून जाहिराती, स्टॉल लावणे, प्रदर्शनामध्ये सहभाग, परीक्षांचे, टाईमटेबल, परीक्षा केंद्रावर प्रमोशन, World Cup / IPL कॅलेंडर छापून वाटणे, ईव्हेंट, अॅव्हिटींचे आयोजन, मार्च एप्रिल व मे बॅचसाठी जास्तीत जास्त मार्केटिंग करने यामध्ये जानेवारी ते मे २०११ पर्येंतचा वेळ जाईल.

काही पथ्ये : कमी खर्चाचे प्रभावी मार्ग वापरा, भरमसाठ खर्चाच्या योजना आखू नका, कॉमन जाहिरातींसाठी Contribution देताना बजेट आणि मिडिया प्लॅन तपासा, अशा Contribution चा व्यवस्थित लेखी हिशोब मागा. Overselling करू नका, एकावर एक फ्री, गिफ्ट, लकी-ड्रॅा टाळा. Undercutting करू नका, फी मध्ये सवलत, सुट, माफी, यामध्ये, तुमचंच नुकसान आहे. फी कमी केली म्हणून कमी शिकवलं तरी चालेल अशी होणारी भावना फारचं घातक आहे. कोणत्याही लोकल व्यवसायासाठी Word of Mouth (काही लोक Mouth to Mouth असंही म्हणतात) अतिशय महत्वाचं असतं. जास्तीत जास्त व्यवसाय जर रेफरन्स मधून येत असेल तर उत्तम. आपले विद्यार्थीच आपले मार्केटिंग करणारे झाले पाहिजेत वगैरे तुम्ही जाणताच. Discount देण्यामध्ये तात्पुरता फायदा होईलही पण Long Term नुकसानच आहे. त्यामुळे स्पर्धा ही स्केलच्या निगेटिव्ह साईडने करण्या पेक्षा पॅाझीटिव्ह साईडने करणे केह्वाही चांगले.

विद्यार्थी सध्या सायबर कॅफे, मित्र, शाळा ईत्यादि ठिकाणी गरजेपुरता कॉम्प्युटर शिकतात. केवळ कॉम्प्युटर शिकण्यासाठी म्हणून कोणी येईल याची वाट पहात बसण्यापेक्षा त्याला इतर प्रशिक्षण कार्यक्रमांची विविध उपक्रमांची जोड देता येईल. त्या दृष्टीने योग्य नियोजन आपण करू शकता.

Computer Subject Tuitions : कॉम्प्युटर च्या बॅचलर आणि इन्जिनीअरिंग च्या विद्यार्थ्यांकरिता Computer Subjects (Programming Languages C, C ++, VB, VB.NET, Data Structures, Java, Micro Processors) च्या टयूशन घेणे हा एक मोठा व्यवसाय असून हमखास उत्पन्न देणारा उपक्रम आहे. यासाठी आपण आपल्या faculty वर जास्त अवलंबून न राहता राबवता येण्यासारखा एक बिझनेस प्लान सुचवणारं वेगळं पत्र लवकरच आपणाला पाठवत आहोत.

Tally ERP 9, DTP, Web Technologies, Hardware, English Speaking : या आणि इत्यादी विषयांच्या वर्षभर अॅडमिशन करता येऊ शकतात. पण यासाठी चांगली Faculty / प्रशिक्षक मिळणं, अशी Faculty टिकून राहणं, त्या Faculty वर आपण पूर्णपणे अवलंबून असणं असे अनेक घटक असतात. सतत बदलणारी Software आणि त्यांची Versions शिकत राहणंही गरजेचं असतं. यासाठी आपल्या संघटने मार्फत वरील सर्व विषयांचे 2 / 2 दिवसांचे Faculty Training Workshops पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहेत. चांगल्या Set-Up असलेल्या कॉम्प्युटर लॅब मध्ये तज्ञ प्रशिक्षकाकडून Tally ERP 9 सारख्या विषयाचं सखोल प्रशिक्षण घेतल्यास तुमच्या सेंटरमध्ये तुम्ही वर्षभर हे कोर्सेस आत्मविश्वासाने चालवू शकता. या Faculty Training चे तपशीलही आपणाला स्वतंत्र पत्राद्वारे कळवण्यात येतील. मार्च पर्यंत असलेल्या वेळेत सदर ट्रेनिंग पूर्ण करून त्यानंतर वर्षभर व्यवसाय वाढविता येईल.

End Of Certification ERA : प्रमाणपत्र युगाचा अस्त : प्रशिक्षणाचा मूळ उद्देश व्यक्तीमध्ये कौशल्य विकास घडवून आणणे हा आहे. कौशल्य (Skill) ही प्रत्यक्ष दाखवण्याची, अनुभवण्याची गोष्ट आहे. त्यासाठी अजून दुस-या पुराव्याची गरज असण्याची आवश्यकताच नाही. उदाहरणार्थ – इंग्लिश स्पिकिंग. इंग्रजी बोलता येतं हे सिद्ध करण्यासाठी प्रत्यक्ष तोंड उघडून इंग्रजी बोलून दाखवणे आवश्यक आहे. माझ्याकडे अमुक संस्थेचे इंग्लिश स्पिकिंग कोर्सचे प्रमाणपत्र आहे म्हणून मला इंग्रजी बोलता येतं असं म्हणणे हा मूर्खपणा आहे. प्रशिक्षण व्यवसायाची सुरवात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कौशल्य शिकवणे या गरजेतून झाली. पारंपारिक शिक्षणामध्ये ज्या कौशल्यांचा अभाव होता अशा सर्व Skill आणि Technologies चे प्रशिक्षण कार्यक्रम जागोजागी सुरु झाले. त्यानंतर अभ्यासक्रम, सिलॅबस, टेक्निकल नो-हाऊ, कोर्स मटेरीअल, स्टॅन्डरडायझेशन, शासन मान्यता, ब्रॅण्ड, जाहिराती, परीक्षा आणि प्रमाणपत्र अशा क्रमाने आणि अशा गोष्टींसाठी हळू हळू प्रशिक्षण व्यवसाय प्रमाणपत्र केंद्रित (Certificate Centric) झाला. खरतर प्रमाणपत्र ही ब्रॅन्ड ओनर ची गरज आहे. प्रमाणपत्राचा आग्रह धरल्यामुळे Franchiser / ब्रॅन्ड ओनरला व्यवसायावर नियंत्रण ठेवता येतं. (Certificate becomes the control point) या प्रक्रीये मध्ये हळूहळू कौशल्य (Skill) शिकवणे बाजूला पडले आणि प्रमाणपत्राला अवाजवी महत्व आले. शिकवण्याच्या प्रक्रियेला दुय्यम महत्व आले. प्रशिक्षण देण्यामधील आनंद आणि समाधान कमी होत गेले.

प्रत्यक्ष रोजगार आणि नोकरीच्या बाजारात आणि industry मध्ये मात्र कोणता प्रमाणपत्र आहे याला विशेष महत्व दिलं जात नाही. सध्या नोकरीसाठीच्या मुलाखतीमध्ये कंपन्या उमेदवाराकडे कोणतं प्रमाणपत्र आहे? ते मान्यताप्राप्त आहे का नाही? उमेदवार कोणत्या विद्यापीठाचा पदवीधर आहे? या सारख्या गोष्टींकडे विशेष लक्ष देत नाहीत. उमेदवाराला काय काय शिकवलं या पेक्षा त्याला काय करता येतं हे प्रत्यक्ष तपासले जाते. पूर्वी बायोडेटा 4 - 4 पानांचा असे. त्याला अजून 5 - 6 प्रमाणपत्रांच्या झेरॅाक्स जोडलेल्या असत. मुलाखतीला जाताना उमेदवार, मूळ प्रमाणपत्रांची फाइल / फोल्डर सांभाळत, कसरत करत जात असे. सध्याच्या काळात हे सर्व बंद झालं आहे.

अर्थात टॅाप च्या शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थांच्या प्रमाणपत्राला आज संपूर्ण जगात किंमत आहेच. उदाहरणार्थ IIT, IIM, Harvard Business School etc. अश्या मोजक्या दहा शिक्षण संस्था, त्याखालील 100 उत्तम संस्था, त्याखाली 1,000 विद्यापिठं, त्याखालील 10,000 महाविद्यालयं, आणि त्याखालील 1,00,000 प्रशिक्षण संस्था असं हा पिरॅमिड आहे. याच क्रमाने Certificate चे महत्वही कमी होताना दिसेल.

त्यामुळे आज पुन्हा एकदा प्रत्यक्ष काय स्किल शिकवलं, कसं शिकवलं, आणि ते विद्यार्थ्याला पूर्णपणे आत्मसात झालं का? हीच गोष्ट महत्वाची राहिली आहे, प्रमाणपत्राला महत्व नाही. तसेच या सोबत त्या उमेदवाराचे संवाद कौशल्य, अॅटीट्युड, गरजुपणा, प्रेझेनटेबल असणं, टीमचा भाग म्हणून काम करण्याची क्षमता इत्यादी गोष्टीनाहि महत्व दिलं जातं. प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण कंपन्या स्वतःच देतात. केवळ कॉम्पुटर चालवता येतो, प्रोग्रामिंग येतं, वेब टेक्नाँलाँजीज येतात म्हणून नोकरी मिळण्याचे दिवशी राहिले नाहीत.

त्यामुळे मित्रहो या बदलत्या परिस्थितीमध्ये आपण करत असलेल्या कामाचे स्वरूप बदलणंही गरजेचा आहे. स्वतः बदलला सामोरे गेलात तर काही choice असेल. अन्यथा परिस्थिती तुम्हाला जबरदस्तीने बदलायला भाग पाडेल हे सत्य आहे. Change is The Only Constant Thing हेच त्रिकालाबाधित सत्य आहे.

संघटनेच्या माध्यमातून या बदलांशी जुळवून घेण्यासाठी सर्वाना सक्षम बनवणारे कार्यक्रम सातत्याने राबवले जातील. काळ सुसंगत राहण्यासाठी सुयोग्य विचारसरणी, परीस्थितीचे आकलन आणि संधी उपलब्ध करून देणे हे महत्वाचे काम आपली संघटना करू शकणार आहे. मित्रहो, संघटनेची मेम्बरशिप, ताकद, सदस्य संख्या वाढवणं आपल्या सर्वांच्या long term हिताच्या दृष्टीने महत्वाचे आहे. यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणं, संघटीत होणं, विचारांचं आदान प्रदान करणं, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं, प्रसंगी संघर्ष करणं या सर्व गोष्टी आपण एकजुटीने करणं आवश्यक आहे. आपला सर्वांचा प्रतिसाद उत्साहवर्धक आहेच. तो भविष्यातही असाच वाढता राहील अशी अपेक्षा. आपले विचार आपण आम्हाला पत्राने, इमेलद्वारा अथवा फोन करून कळवल्यास त्याचे स्वागतच केले जाईल. या पुढील योजनाची माहिती लवकरच आपल्यापर्यंत पोचवली जाईल. तुमच्या आजूबाजूच्या संस्थाचालकांनाही कृपया याची माहिती द्या. सर्वाना सहभागी करून घ्या. नवीन वर्ष आपण सर्वाना सुख समृद्धी आणि भरभराटीचे जाओ ही शुभेच्छा.

धन्यवाद..
आपला,

संदीप ताम्हनकर,
संस्थापक अध्यक्ष
प्रशिक्षण संस्था संघटना.