जिल्हा प्रतिनिधी -

मित्रहो,

संघटनेच्या दृष्टीने जिल्हा प्रतिनिधी हे पद अतिशय महत्वाचे आहे. संघटनेचे हात, पाय, नाक, कान, डोळे म्हणजे District Co-ordinator असणार आहेत. DC च्या कामावर, सहभागावर आणि योगदानावरच प्रत्यक्षात हि संघटना भविष्यात दखलपात्र काम करू शकणार आहे. जिल्हा समन्वयकचं काम अतिशय महत्वाचं, आव्हानात्मक व नेतृत्वगुण वाढवणारं असणार आहे. संघटनेच्या पुढील वाटचालीमध्ये अनेक गोष्टींचे नियोजन केलेलं आहे. अनेक नवीन उपक्रम राबवायचे आहेत. अनेक शासकीय योजनांच्या माध्यमातून अनुदानित कार्यक्रम मिळवणे, वेगवेगळे tie-up करणे, देशव्यापी प्रसार करणे, संस्था चालकांच्या अडी अडचणी सोडवणे, एका दर्जेदार समाजाभिमुख कामासाठी कटिबद्ध असणे अशा अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. DC म्हणून वरील सर्व कामाला पुरेपूर न्याय देऊ शकेन असं ज्यांना वाटत असेल अशांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.

District Co-ordinator चा रोल :- संस्थेचे मेंबर्स वाढविणे, मेंबर्सच्या अडीअडचणीची दखल घेणे, संस्थेची ध्येय धोरणे व कार्यक्रम जिल्ह्यामध्ये राबविणे, मान्यताप्राप्त प्रशिक्षण केंद्रांची संख्या, विद्यार्थि व नेटवर्क वाढविणे, इन्स्पेक्शन, देखरेख, सपोर्ट, मान्यता देणे, परीक्षा घेणे, जाहिरात व इतर प्रमोशनल कामे करणे इ.

DC मानधन :- सदर DC नां कामाच्या प्रमाणात योग्य असा आकर्षक मोबदला दिला जाईल. एका DC च्या अंतर्गत जर सुमारे 25 चांगल्या सेन्टर्सचं नेटवर्क असेल तर एका DC ला पहिल्या वर्षामध्ये कमीत कमी सुमारे 1 ते 1.50 लाख रुपये उत्पन्न मिळवता येऊ शकेल असे Business Proposal तयार करण्यात आले आहे.

जिल्हा समन्वयक म्हणून मनापासून काम करण्याची इच्छा असणाऱ्या संस्था चालकांनी / व्यक्तींनी आमच्याशी आवर्जून संपर्क साधावा हि विनंती. District Co-ordinator पदासाठी इच्छुक व्यक्तींची वैयक्तिक मुलाखती घेवून जिल्हा समन्वयकांच्या नेमणुका करण्यात येतील.

DC होण्यासाठी प्रथम ATC Member होणे अनिवार्य आहे. त्यामुळे येताना सोबत ATC चा अर्ज पूर्ण भरून स्वतःचा एक फोटो आणि रुपये 2809.00 ATC Annual License Fee साठी घेवून यावे.

[ Download ] Proposal for becoming a District Co-ordinator.