Centre Authorization Procedure

आपल्याकडील विविध कोर्सेसला असणा-या विद्यार्थ्यासाठी ATC ची मान्यता घ्या आणि रजिस्ट्रेशन करा. केंद्र मान्यतेची सोपी प्रक्रिया खालील प्रमाणे आहे –

  1. सोबत attach केलेली PDF download / open करून त्याचा प्रिंटआउट काढावा.
  2. संघटने विषयी आणि उपक्रमांविषयी माहितीही वाचावी.
  3. केंद्र मान्यतेचा अॅप्लिकेशन फॉर्म च्या प्रिंटआउट मध्ये पूर्ण माहिती भरावी आणि स्वतःचा सही शिक्का करावा.
  4. अर्जाच्या पान क्र. 3 वर दोन स्थानिक नागरिकांचे नाव पत्ता आणि फोन नंबर व ओळख म्हणून सही घ्यावी.
  5. सेंटरच्या जागेचा मालकी हक्काचा / भाडे कराराचा पुरावा, शहरातील तुमच्या केंद्राच्या लोकेशनचा प्लान, सेंटर चा अंतर्गत लेआउट प्लान आणि केंद्राचे आतील बाहेरील किमान 4 फोटो, केंद्र चालक आणि इतर प्रशिक्षकांचे बायोडाटा फोटोसह, शॉप अॅक्ट अथवा ग्रामपंचायत चा नाहरकत दाखला, इत्यादी प्रमाणपत्र जोडावी.
  6. रुपये 2,809.00 मात्र चा (रु. 2,500.00 + 12.36 % Service Tax सह) कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेवर काढलेला Association of Training Centres या नावाने पुणे येथे देय्य असलेला एक डिमांड ड्राफ्ट काढावा.
  7. वरीलप्रमाणे सर्व कागदपत्रे आणि ड्राफ्ट असोसिअशन च्या पुणे येथील पत्त्यावर कुरिअर द्वारा पाठवून द्यावी.
  8. आपण स्टार्टअप कीट पुणे येथे प्रत्यक्ष येवून घेऊ शकता अथवा आपणाला कुरिअर करण्यात येईल.

अधिक माहिती, प्रश्न, सूचना अथवा शंका निरसनासाठी आपण फोनवर ही बोलू शकता.

[ Download ] ATC Centre Application Form.