Centre for Implementing Computer Education - CICE

ATC या संघटनेच्या माध्यमातून आपण इतिहासात प्रथमच एक स्वतःचा कॉम्प्युटर ट्रेनिंगचा ब्रॅन्ड, कोर्सेस, सर्टीफिकेशन आणि प्रशिक्षण केंद्रांना मान्यतेची योजना सुरु करत आहोत. आजवर आपण इतरांचा ब्रॅन्ड मेहनतीने चालविला, पुढे नेला, आणि त्यामधील फोलपणाही आपल्या लक्षात आला. उगाचंच कुठल्यातरी So Called Government मान्यताप्राप्त सर्टीफिकेशनसाठी प्रत्येकाने हजारो नव्हे लक्षावधी रुपये मोजले आणि अशा Brands ची मनमानी वर्षानुवर्ष सहन केली. हे थांबलं पाहिजे. आता आपल्या संघटनेचा स्वतःचा ब्रॅन्ड असेल. शेवटी Brand म्हणजे तरी काय? अनेक वर्ष व्यवसायात राहून कमविलेले नाव, गुडविल, स्थान, ह्या सर्व गोष्टी आपल्याकडेही आहेतच. आता आपण चालवू तो ब्रॅन्ड, आपण म्हणू त्या पद्धतीनं चालेल तो आपला ब्रॅन्ड.

ATC ही शासकीय पातळीवर रजीस्टर्ड, मान्यताप्राप्त, पंजीकृत, कायदेशीर संस्था / संघटना आहे. त्यामुळे आपल्या सर्वांकडे संघटनेचा एक भक्कम Brand असणार आहे.

Association of Training Centres- ATC ची केंद्र मान्यता घेण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे, आकर्षक आहे, संस्था व केंद्र चालकांच्या फायद्याची आहे. या योजनेची घोषणा केल्यापासून आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामधून शेकडो लोकांनी प्रतिसाद दिला आहे. किमान पाच (5) कॉम्प्युटर व प्रशिक्षित तज्ञ शिक्षक असलेल्या कोणालाही मान्यतेसाठी अर्ज करता येईल. यामध्ये विविध आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अनेक विद्यार्थिप्रीय कोर्सेस चालवता येतील. केंद्र मान्यतेच्या अर्जाचा नमुना, कोर्सेसचे तपशील, अभ्यासक्रम, कालावधी व Fee Structure सोबत जोडले आहे.

असोसिएशन ऑफ ट्रेनिंग सेन्टर्स या सामाजिक संस्थेच्या ऑथोराइजड कॉम्प्युटर कोर्सेस प्रशिक्षण केंद्र मान्यतेसाठी एका वर्षाची लायसन्स फी केवळ रु. 2,500.00 (रुपये दोन हजार पाचशे मात्र) आहे. (12.36 % Service Tax लागू आहे.) लायसन्स फी व्यतिरिक्त इतर कोणतेही डिपॉंझीट नाही. या फीमध्येच तुम्हाला अनुषंगिक फायदे आपणाला मिळत राहतील. कोर्स फीच्या केवळ 15 % Student Registration Fees फी भरायची आहे. (12.36 % Service Tax लागू आहे.) केंद्रांना (तसेच विद्यार्थ्यांनाही) या फी मध्येच छापील कोर्स मटेरीअल / पुस्तकं कोणत्याही वेगळ्या शुल्काशिवाय मिळणार आहे. म्हणजेच 15 % Student Registration Fees मध्येच पुस्तकेही मिळणार आहेत. पुस्तकांसाठी वेगळे पैसे भरण्याची गरज नाही. तसेच CICE पुणे मार्फत केंद्राचालकांच्या सहकार्याने वृत्तपत्रांमधील जाहिरातीही दिल्या जातील.

या शिवाय मागणीनुसार परीक्षा, वेळेत मिळणारं, आकर्षक आणि महाराष्ट्र शासनाच्या सेवायोजन कार्यालयात नोंदणीक्षम प्रमाणपत्र, सपोर्ट मटेरीअल, प्रमोशनल मटेरीअल, सोपं रिपोर्टिंग, वेब बेस फ्रेमवर्क, ISO प्रमाणपत्रासाठी नोंदणी, शासकीय व इतर अनुदानित योजनांमध्ये सहभाग व व्यवसाय इ. अनेक गोष्टी या मध्ये समाविष्ट असणार आहेत. केंद्रांना मान्यता देण्याची संपूर्ण प्रक्रिया परस्पर विश्वास, जबाबदारी, लोकशाही व स्वातंत्र्य या उदात्त मानवी तत्वांवर आधारित आहे. केंद्रचालक या मान्यतेसोबत इतरही कोणत्याही मान्यता वा स्वतःचे कोर्सेस चालवू शकणार आहेत.